महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मदरशात नथुराम गोडसे, साध्वी प्रज्ञासारखे लोक जन्माला येत नाहीत - आझम खान - Godse and Pragya Thakur

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंगळवारी घोषीत केलेल्या या योजनेला आझम खाना यांनी विरोध केला असला तरी अनेक मुस्लीम तत्ववेत्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आझम खान

By

Published : Jun 12, 2019, 3:17 PM IST

नवी दिल्ली- नेहमी आपल्या विवादास्पद वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान हे त्यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मदरशांमध्ये नथुराम गोडसे आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे लोक जन्माला येत नाहीत असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मदरशांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्याची मोदींची योजना आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आझम खान म्हणाले, की मदरशांमध्ये गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे आणि प्रज्ञा सिंह ठाकूर सारखे लोक जन्माला येत नाहीत. नथुराम गोडसेच्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्यांना सर्वप्रथम देशद्रोही घोषीत करण्यात यावे. दहशतवादी कारवायांमध्ये दोषी ठरवल्या गेलेल्या आरोपींना बक्षिस देणे बंद करावे, असे आवाहन त्यांनी केले.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञा ठाकूर या आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहे. त्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडूण गेलेल्या आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांनी नथुराम गोडसेला देशभक्त संबोधले होते.

केंद्र सरकारला मदरशांना मदतच करायची असेल तर त्यांनी मदरशांची अवस्था सुधारली पाहिजे. मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते. मात्र, सोबतच तेथे इंग्रजी, हिंदी आणि गणित हे विषयही शिकवले जातात. मदरशांना मदत म्हणून त्यांच्या सोयीसुविधांचा स्तर वाढवला पाहिजे. नविन इमारती स्थापन केल्या पाहिजे, असे आझम खान यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंगळवारी घोषीत केलेल्या या योजनेला आझम खाना यांनी विरोध केला असला तरी अनेक मुस्लीम तत्ववेत्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details