नवी दिल्ली -मुसलमानांना झुंडबळीची शिक्षा १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यापासून मिळत आहे. पुढे काहीही घडो, मुसलमानांना याला तोंड द्यावेच लागेल, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार आझम खान यांनी केले आहे.
'स्वातंत्र्य मिळाल्यापासून मुसलमान झुंडीचे शिकार होत आहेत' - पंडित जवाहरलाल नेहरू
आझम खान म्हणाले, १९४७ पासून झुंडबळीसारख्या दंशाला मुसलमान झेलत आहेत. हे सर्व मुसलमान १९४७ साली पाकिस्तानात का गेले नाहीत?
आझम खान म्हणाले, १९४७ पासून झुंडबळीसारख्या दंशाला मुसलमान झेलत आहेत. हे सर्व मुसलमान १९४७ साली पाकिस्तानात का गेले नाहीत? मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांना विचारावे लागेल. या सर्वानीच मुसलमानांना आश्वासन दिले होते. यांनी आश्वासन दिल्यामुळेच मुसलमान पाकिस्तानात गेले नाहीत.
काल बिहारमध्ये बनियापूर ठाणे क्षेत्रातील पिठौरी नंदलाल टोला गावात जमावाच्या मारहाणीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करताना तिघांना अटक केली आहे. याआधीही उत्तरप्रदेशमध्ये गोवंश तस्करीवरुन हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.