महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनावर मात करण्याची ताकद आयुर्वेदात; जाणून घ्या काय आहेत उपाय ? - कोरोना पासून कसा बचाव करावा

जानेवारी महिन्यात हा विषाणू सगळीकडे पसरण्यास सुरूवात झाली. तेव्हापासून जगभरात तब्बल २४ हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर भारताच्या केरळमध्येही तीन जणांना याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या पासून सर्वांनी काळजी घ्यायला हवी.

Ayurvedic remedy to cure corona virus
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 5, 2020, 8:02 PM IST

मानवी शरीर हे रोग प्रतिकाराक क्षमतेच्या विविध स्तरांनी बनले आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, तणाव आणि अस्वच्छतेमुळे रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होते. आपल्या शरीरात बाहेरच्या परिसंस्थेमधील एखादा रोगजनक घटक, म्हणजेच व्हायरस (विषाणू) आल्यास आपले आयुष्य धोक्यात येते. हाच विषाणू, साथीच्या रोगाच्या माध्यमातून देशभर, किंवा जगभरही पसरू शकतो. असाच एक विषाणू सध्या सगळीकडे थैमान घालतो आहे, तो म्हणजे चीनमध्ये उगम पावलेला 'कोरोना'.

जानेवारी महिन्यात हा विषाणू सगळीकडे पसरण्यास सुरूवात झाली. तेव्हापासून जगभरात तब्बल २४ हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर भारताच्या केरळमध्येही तीन जणांना याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे देशाच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांना चीनमध्ये जाण्यापासून मनाई केली आहे. तसेच, १५ जानेवारीनंतर चीनमधून आलेल्या कोणत्याही नागरिकाला सरकार निरिक्षणाखाली ठेऊ शकते, असेही मंत्रालयाने जाहीर केले आहे.

जगभरातील व्हायरॉलॉजिस्ट सध्या कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी या विषाणूचे सॅम्पलही मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तसेच, आपण तयार केलेले औषध तपासण्यासाठी, आधी त्या विषाणूचे प्राण्यांमधील मॉडेलही तयार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लवकरच या विषाणूविरोधातील औषध उपलब्ध होईल हे नक्कीच आहे. मात्र तोपर्यंत आपल्याला खबरदारीचे उपाय घ्यावे लागतील.

काय आहे कोरोना विषाणू?

श्वसनप्रणालीमार्फत विविध प्रकारचे कित्येक विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. या विषाणूंमुळे आपल्याला सर्दी, पडसे आणि तत्सम आजार होऊ शकतात. कोरोना व्हायरस हा विषाणूंच्या एका नवीन श्रेणीशी संबंधित आहे, जो अनेक दशकांपूर्वी प्राण्यांमधून मानवांमध्ये संक्रमित झाला होता. कोरोना विषाणूचे चार प्रकार आहेत, यांपैकी तीन प्रकारांमुळे मानवांना संसर्ग होऊ शकतो.

कोरोना विषाणूचा उद्रेक..

चीनमध्ये 'सार्स'ची (तीव्र गंभीर श्वसन सिंड्रोम) प्रकरणे ही २००२-२००३ च्या दरम्यान पहिल्यांदा दिसून आली. याच्या एक दशकानंतर आलेला 'मर्स' (मध्य पूर्व श्वसन सिंड्रोम) हा खरेतर कोरोना विषाणूमुळेच झाला होता. या दोन जागतिक साथीच्या रोगांमुळे शेकडो लोकांचा बळी गेला आहे. यावेळी समोर आलेला कोरोना विषाणू हा वुहानच्या एका मांस बाजारात उत्पन्न झाला, आणि आता जगभर पसरत आहे.

काय आहेत कोरोना व्हायरसची लक्षणे ?

ताप

खोकला

श्वसनास अडथळा

थंडी

छातीत दुखणे

शरीरदुखी

घसा खवखवणे

अस्वस्थता

डोकेदुखी

अतिसार

मळमळ

उलट्या होणे

गंभीर स्तरावरील लक्षणे -

अवयव निकामी होणे

न्यूमोनिया

अशी घ्या खबरदारी -

  • दिवसातून वारंवार हात स्वच्छ धुवावेत. यासाठी साबण किंवा अल्कोल मिश्रित असलेली जंतुनाशकांचा (हॅण्डवॉश) वापर करावा.
  • खोकताना आणि शिंकताना टिशू पेपरचा वापर करावा. ज्याद्वारे नाक-तोंड झाकले जाईल. त्यानंतर ते ताबडतोब कचऱ्यात टाकून द्या आणि आपले हात स्वच्छ धुवा.
  • ज्याला ताप आणि खोकला आहे, त्याच्याशी जवळचा संपर्क टाळा.
  • जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येत असेल तर तत्काळ वैद्यकीय सेवा घ्याव्यात. आणि तुम्ही कोठून प्रवास केला असेल त्याची माहिती डॉक्टरांना सांगा.
  • कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा ठिकाणच्या भागातील जिवंत प्राणी आणि त्यांनी स्पर्श केलेल्या पृष्ठभागाशी थेट असुरक्षित संपर्क टाळावा.
  • कच्चे किंवा न शिजवलेल्या प्राण्यांच्या उत्पादनांचे (मांस) सेवन करू नका. कच्चे मांस, दूध किंवा जनावरांच्या अवयवांना काळजीपूर्वक हाताळा जेणेकरून न शिजवलेल्या पदार्थांचा संसर्ग होऊ नये.
  • भरपूर पाणी प्या
  • डोळ्यातूनही हा विषाणू शरीरात जाण्याची शक्यता असल्यामुळे, बाहेर जाताना गॉगल वापरा.
  • फळे आणि भाज्या नीट धुवून घ्या.

सर्वाधिक धोका कोणाला?

  • मधुमेह, फुफ्फुसाचे दीर्घकालीन आजार किंवा हृदयविकार असलेले व्यक्ती.
  • वृद्ध व्यक्ती.
  • लहान मुले.
  • अवयव प्रत्यारोपण केलेल्या आणि रोगप्रतिकारक औषधे घेत असलेल्या व्यक्ती.
  • कर्करोगाचा उपचार सुरू असलेले रूग्ण.



आजार रोखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय उपचार घ्यावे

भारतीय पारंपरिक उपचार पद्धती आयुर्वेदाने कोरोना व्हायरस सारख्या श्वसननलिकेच्या संसर्गासारखी लक्षणे सांगितली आहेत. एखादा आजार नवा असला तरी विषाणूंविरोधी प्रतिकारक्षमता तयार करण्यासाठी आयुर्वेदाने प्रयत्नही केले आहेत. आयुर्वेदात विविध विषाणूंबाबात माहिती नसली तरीही आजार बरा करण्याची क्षमता आहे.

आयुर्वेदानुसार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेले काही उपाय. कोरोना व्हायरसची लागण आपण यातून थांबवू शकतो. १२ वर्षांखालील बालकांनी अर्धा डोस घेतला तरी पुरेसे आहे.

1) शदंगा पनीयाम - १० ते १५ दिवस सकाळी नाष्टा करण्याआधी १५ एम. एल घ्यावे.

२) अगस्त्य हरीतकी रसायन - दिवसातून दोन वेळा १० ते १५ दिवस जेवन करण्याआधी ५ ग्रॅम घ्यावे.

किंवा

३) हरिद्रा खंड - १० ते १५ दिवस दजरोज जेवनाआधी ५ ग्रॅम घ्यावे

कफकेतू रस - १० ते १५ दिवस दररोज एकवेळा घ्यावे.

किंवा

त्रिकटु चूर्ण २५ ग्रॅम, गुडूची सत्व ५ ग्रॅम आणि यष्टिमधु चुर्ण २५ ग्रॅम हे सर्व एकत्र मिसळून १० ते १५ दिवस कोमट पाणी किंवा मधासोबत घ्यावे.

हे चुर्ण कोमट पाणी किंवा मधासोबत घ्यावेत.

कोरोना व्हायरस संरर्गजन्य आजार असून जगभर वेगाने पसरत आहे. भारतामध्ये आधीच कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण सापडले आहेत. उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय बरा. जे नागरिक चीनमधून आले आहेत त्यांना जर ताप आणि थंडीची लक्षणे जाणवली तर त्वरीत डॉक्टरांना दाखवावे. ताजे शिजवलेले अन्नाचे सेवन करणे, स्वच्छता बाळगणे, आणि उकळलेले पाणी पीणे ही कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी महत्त्वाची आहेत.

डॉ. पी. व्ही. रंगनायकल्लु( निवृत्त एचओडी, मेडिकल फिजिओलॉजी, एस. व्ही आयुर्वेदा महाविद्यालयस तिरुपती)

ABOUT THE AUTHOR

...view details