महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अयोध्या प्रकरण : पंतप्रधानांचे ट्विटरद्वारे शांतता राखण्याचे आवाहन - अयोध्या वाद

'अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय असेल, तो कोणाचाही विजय वा पराजय नसणार आहे. या निर्णयानंतर भारतातील शांतता, एकात्मता आणि सद्भावना ही कायम राहील, याकडे प्राधान्य देण्याचे मी नागरिकांना आवाहन करतो' अशा आशयाचे ट्विट करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Ayodhya Verdict : PM Modi urges people to keep the harmony of country

By

Published : Nov 8, 2019, 11:50 PM IST

नवी दिल्ली - 'अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय असेल, तो कोणाचाही विजय वा पराजय नसणार आहे. या निर्णयानंतर भारतातील शांतता, एकात्मता आणि सद्भावना ही कायम राहील, याकडे प्राधान्य देण्याचे मी नागरिकांना आवाहन करतो' अशा आशयाचे ट्विट करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.

अयोध्यामधील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्या (शनिवारी) जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, काही राज्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details