महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अयोध्या : मंदिर ट्रस्ट आणि संतांचे नागरिकांना आवाहन, म्हणाले घरीच साजरी करा रामनवमी

दरवर्षी देशभरात रामनवमीची धूम असते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट पसरल्याने रामनवमीच्या उत्सवाबाबत प्रशासन खबरदारी घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन असल्याने नागरिकांनी त्याचे पालन करावे, गर्दी टाळावी म्हणून अयोध्या धामच्या सीमा पूर्णत: सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनाही प्रवेश बंद करण्यात आला असून जिल्ह्याच्या सीमेवर जवानांना तैनात करण्यात आलं आहे. तसेच, बॅरिकेट्स लावून लोकांना अडवले जात आहे.

चंपत राय, महामंत्री, श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट
चंपत राय, महामंत्री, श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट

By

Published : Apr 2, 2020, 1:13 PM IST

Updated : Apr 2, 2020, 3:02 PM IST

अयोध्या - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामजन्म उत्सवाच्या आधीच अयोध्या धामची सीमा पूर्णत: सील करण्यात आली असून प्रशासनाकडून सतत याची पडताळणी केली जात आहे. शरयू नदीच्या तीरावर पीएसी आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. तर, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून भाविकांनी राम जन्म उत्सव घरीच साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अयोध्या : मंदिर ट्रस्ट आणि संतांचे नागरिकांना आवाहन, म्हणाले घरीच साजरी करा रामनवमी

दरवर्षी देशभरात रामनवमीची धूम असते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट पसरल्याने रामनवमीच्या उत्सवाबाबत प्रशासन खबरदारी घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी त्याचे पालन करावे, गर्दी टाळावी म्हणून अयोध्या धामच्या सीमा पूर्णत: सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनाही प्रवेश बंद करण्यात आला असून जिल्ह्याच्या सीमेवर जवानांना तैनात करण्यात आलं आहे. तसेच, बॅरिकेट्स लावून लोकांना अडवले जात आहे. तसेच सआदतगंज, देवकाली एंट्री पॉईंटवर बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. तर, ग्रामीण भागातही लक्ष ठेवण्यात येत आहे.

रामनवमीला सामूहिक स्नान करण्यावरही प्रतिबंध लावण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने स्नान करण्यावर बंदी केली असून प्रशासन याबाबत विशेष खबरदारी घेत आहे. तसेस नदी तीरावर पीएसी आणि रॅपिड एक्शन फोर्सच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे.

रामनवमी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येत साधू-संतही दूरवरून येत असतात. मात्र, यावेळेस राम जन्मभूमी ट्रस्टसोबतच अयोध्येतील संतांनीही नागरिकांना घरी राहूनच रामनवमी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. तर, विश्व हिंदू परिषदने लोकांना घरातूनच राम नाम स्मरण करून कुटुंबासमवेत भजन-किर्तन करून जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

रामनवमी ही चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला असते. या तिथीनुसार दरवर्शी राम जन्मोत्सव साजरा केला जात असतो. यावेळी राम जन्मभूमी परिसरात विशेष धार्मिक अनुष्ठान केले जातात. नवमीला प्रभू राम यांचा जन्माच्या वेळीच्या दृष्यांना प्रतिकात्मक रूपात सादर केले जाते. दुपारी १२ वाजता रामचंद्रांचा जन्म साजरा होत असतो. त्यानंतर, त्यांना कनक भवन येथे नेले जाते. या उत्सवासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रमुख संत आणि श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टनी या उत्सवानिमित्त गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Last Updated : Apr 2, 2020, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details