नवी दिल्ली -राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी झाली. सुनावणी सुरू असताना हिंदू महासभेने राम जन्मभूमीचा दाखवलेला नकाशा मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी फाडला. मुख्य न्यायाधीशांनी पाने फाडण्याचे सांगितल्यानंतरच मी ती पानं फाडली, असे स्पष्टीकरण धवन यांनी दिले.
बुधवारी हिंदू महासभेचे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी 'अयोध्या रिव्हिजिटेड' हे पुस्तक न्यायालयात सादर करण्याचा प्रयत्न केला. बाबरनामामध्ये मशीद बांधल्याचा आणि मंदिर तोडल्याचा उल्लेख नसल्याचं ते म्हणाले. सर्वांत जास्त मंदिरे ही औरंगजेबच्या काळात तोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.