अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर तब्बल ५ लाख ८४ हजार ५७२ मातीचे दिवे पेटविण्यात आले. सर्वात जास्त दिवे पेटवून या कार्यक्रमाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये झाली आहे.
अयोध्या दीपोत्सव २०२० LIVE : लक्ष दिव्यांनी उजळला शरयूचा काठ - deepotsav celebration live update
20:14 November 13
शोभायात्रेला नागरािकांची गर्दी
19:12 November 13
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी प्रभू श्रीरामांची आरती तसेच पूजा केली.
18:52 November 13
शरयू नदीकाठ दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने उजळला आहे. या दीपोत्सवासाठी लाखो दिवे लावण्यात आले आहेत.
18:10 November 13
'राम की पैडी' येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरती केली.
17:34 November 13
दिवाळी म्हणजे अंध:कारावर प्रकाशाचा विजय
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दीपोत्सव कार्यक्रमासाठी ते रामजन्मभूमी अयोध्येत आले आहेत. शोभायात्रा झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. दिवाळी म्हणजे अंध:कारावर प्रकाशाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय आणि अधर्मावर धर्माचा विजय आहे, असे योगी म्हणाले. दृष्टता आणि कटुतेवर सद्भावतेच्या विजयाचे दिवाळी प्रतिक असल्याचे योगी म्हणाले.
16:36 November 13
अयोध्यानगरीत दीपोत्सवाची जोरदार तयारी सुरू
16:26 November 13
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले
16:09 November 13
दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यपाल सहभागी
दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत आले असून त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. राज्यपाल आनंदीबेन पटेल याही त्यांच्याबरोबर आहेत. अयोध्या नगरीत मागील तीन वर्षांपासून प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक आणि दिव्य दीपोत्सव कार्यक्रम होत आहे. हे कार्यक्रमाचे चौथे वर्ष आहे. यावेळी ५ लाख ५१ हजार दिवे लावून एक नवा जागतिक विक्रम होणार आहे.
15:58 November 13
दीपोत्सवसाठी अयोध्येत आकर्षक रोषणाई
15:55 November 13
अयोध्या दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी
अयोध्या दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले असून ते राम मंदिर स्थळी आले आहेत.
15:43 November 13
अयोध्या दीपोत्सव २०२०: प्रभू श्रीरामांची शोभायात्रा अयोध्येत पोहोचली, भाविकांकडून जल्लोषात स्वागत
अयोध्या - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत दिवाळी जल्लोाषात साजरी करण्याचे नियोजन केले आहे. दीपोत्सव २०२० सोहळ्यात प्रभू श्रीरामांची शोभायात्रा काढण्यात येत आहे. भाविकांनी या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण अयोध्या शहर भक्तीमय झाले असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येत श्रीराम चरित्रांमधील देखाव्यांसह मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक रामजन्मभूमीच्या मुख्य गेटपर्यंत पोहोचताच, मिरवणुकीत सहभागी झालेल्या कलाकारांनी आणि राम भक्तांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. रामजन्मभूमीच्या गेटवर फुलांचा वर्षाव करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद -
अयोध्येतील मठ, मंदिरे आणि रस्ते विद्युत रोषणाईने उजळले आहेत. दीपोत्सव 2020 देखील सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत यावेळी दीपोत्सव अधिक खास आहे. यंदा अयोध्येत भगवान श्री राम यांचे मंदिर उभारले जात आहे. अयोध्या नगर परिषदेने यावेळी शरयू घाटाच्या बाजूची मठ आणि मंदिरे सजवली आहेत. 24 घाटांवर 5 लाख 51 हजार दिवे पेटवण्यात येणार असून याची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार आहे.
घटनेचे साक्षीदार होण्याचे आम्हाला भाग्य -
अयोध्येव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून लोकांना दीपोत्सवात सहभागी होण्याची परवानगी नाही, असे असूनही दूरदूरचे लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. दीपोत्सवाची परंपरा शतकानुशतके भारतात चालत आली आहे. पण 500 वर्षे वाट पाहिल्यानंतर भगवान राम यांचे मंदिर बांधले जात आहे. तर यंदाचा दीपोत्सव खूप खास आणि अनन्यसाधारण आहे. म्हणूनच आम्ही हा उत्सव पहायला आलो आहोत, असे संत महावीर दास यांनी सांगितले. असे कार्यक्रम आपल्या संस्कृती आणि परंपरेचे मार्गदर्शक असतात. अयोध्येत राहून या घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला आहे, असे अंशुल गुप्ता म्हणाल्या.