केंद्रीय गृह मंत्रालयाकडून चालविल्या जाणाऱ्या सायबर संरक्षण आणि सायबर सुरक्षा जागरुकतेसंदर्भातील ट्विटर हँडलच्या माध्यमामधून देण्यात आला आहे. "काही सायबर गुन्हेगार हे स्पायमॅक्स, कोरोना लाईव्ह १.१ यांसारख्या कथित कोरोना विषाणुशी संबंधित ऍप्सविषयीच्या 'मालवेअर लिंक्स' प्रसार करता आहेत. कोरोना विषाणुविषयी असलेल्या चिंतेच्या वातावरणाचा फायदा घेऊन आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न हे सायबर गुन्हेगार करता आहेत,'' असे सायबर दोस्ताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मार्च २०१८ मध्ये गृह मंत्रालयाकडून बिर्मान करण्यात आलेल्या या हँडलच्या माध्यमामधून लोकांनी "केवायसी वा रिमोट ऍप्सविषयीच्या गुन्ह्यांसंदर्भातही सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
'केवायसी'साठी क्विकसपोर्ट, एनिडेस्क वा टीमव्ह्यूवर अशा स्वरूपाची कोणतीही अॅप्स डाऊनलोड न करण्याचा इशाराही सायबर दोस्तकडून देण्यात आला आहे. अशा अॅप्समुळे तुमच्या 'डिव्हाईसचा अॅक्सेस' मिळून सायबर गुन्हेगारांना गुन्हा करण्यासाठी आवश्यक असलेली बँक खाते क्रमांक, पिन वा ओटीपी अशी संवेदनशील माहिती मिळते, असे सायबर दोस्तकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारमान्य केवायसी केंद्रांवर वा ग्राहकांच्या द्वारी आलेल्या अधिकारी प्रतिनिधींच्या माध्यमामधूनच केवायसीची प्रक्रिया केली जावी, असेही सायबर दोस्तकडून सुचविण्यात आले आहे. "केवायसीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास खाते बंद केले जाईल, अशा स्वरूपाचा इशारा असलेला एसएमएस आला तरीही; नागरिकांनी एसएमएस वा फोनच्या माध्यमामधून वैयक्तिक माहिती उघड करू नये. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित बँक वा सेवा पुरवठादाराच्या ग्राहक हित कक्षास संपर्क करावा,'' असे सायबर दोस्तने म्हटले आहे. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांविषयी आलेल्या तक्रारींसंदर्भात विचारणा केल्यानंतर गृह मंत्रालयामधील सूत्रांकडून याविषयी निश्चित क्रमांक देण्यात आला नाही. मात्र, याविषयी अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.