रायपूर- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरामध्ये भीती पसरली आहे. शहरी लोकांबरोबरच दुर्गम आदिवासी भागातही कोरोनाबाबत जनजागृती पसरली आहे. यासंबधीचा एक फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दंतेवाडा या दुर्गम भागातील घोटपाल गावातील नागरिकांनी मास्क आणि ग्लोव्ज घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
दुर्गम आदिवासीही कोरोनाच्या धोक्यापासून सतर्क; मास्क, ग्लोव्ज घालून केले अंत्यसंस्कार
गावातील फक्त 10 नागरिकांनी मृतदेहार अंत्यसंस्कार केले. यावेळी सरकारने कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासंबधी जे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन नागरिकांनी केले.
गावातील फक्त 10 नागरिकांनी मृतदेहार अंत्यसंस्कार केले. यावेळी सरकारने कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासंबधी जे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन नागरिकांनी केले. अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या दहाही लोकांनी मास्क आणि ग्लोव्ज घातले होते. आदिवासी भागात राहत असूनही कोरोनाच्या धोक्यापासून येथील नागरिक सतर्क असल्याचे यातून दिसून येत आले.
घोटपाल गावातील एका 22 वर्षीय युवकाची तेलंगाणात बोअरवेलच्या गाडीखाली आल्यामुळे मृत्यू झाला होता. त्याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या गावामध्ये पोलीसही कधी येत नाही, तसेच सरकारी अधिकारीही फिरकत नाहीत. तरीही नागरिक कोरोनाच्या धोक्यापासून सतर्क आहेत. अनेक वेळा शहरी भागातील नागरिकांनाही मास्क घालण्यास सांगावे लागते, मात्र, घोटपाल येथील आदिवासी बांधव सरकारी आदेशांविनाही स्वतची काळजी घेत आहेत.