चेन्नई -कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान तामिळनाडूमध्ये ऑटोमोबाईल शोरूम आणि किरकोळ विक्रेत्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.
तामिळनाडूमध्ये ऑटोमोबाईल शोरूम अन् किरकोळ विक्रेत्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी - COVID-19 warrior
तामिळनाडूमध्ये ऑटोमोबाईल शोरूम आणि किरकोळ विक्रेत्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.
कन्टेन्मेंट झोन नसलेल्या भागांमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. लहान दागिने व कापड शोरूम, दुचाकी आणि कार शोरूम, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचे काम करणार्या कंपन्या काम सुरु करु शकतात.
चहाची दुकाने, बेकरी आणि रेस्टॉरंट्सना सेवा देण्याची परवानगी असेल. किराणा व भाजीपाल्याच्या दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहतील. किराणा आणि भाजीपालाची दुकाने आजपासून सायंकाळी 7 पर्यंत वाढविला आहे. ही दुकाने सकाळी 6 वाजल्यापासून उघडता येतील. यापूर्वी ही दुकाने सांयकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी होती.