महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लष्करी भरतीचे स्वप्न राहिले अपूर्णच.. ऑटोला टँकरने चिरडल्याने ९ तरुणांचा मृत्यू - accident news haryana

लष्करात जाण्याचं हरियाणामधील ९ तरुणांचं स्वप्न अधूर राहील आहे. हिसार येथून लष्कराची भरती आटोपून माघारी येताना तरुणांच्या ऑटोला एका तेलाच्या टँकरने जोरदार धडक दिली.

हरियाणा अपघात

By

Published : Sep 25, 2019, 1:38 PM IST

चंदिगड- लष्करात जाण्याचं हरियाणामधील ९ तरुणांचं स्वप्न अधूर राहील आहे. हिसार येथून लष्कराची भरती आटोपून माघारी येताना तरुणांच्या ऑटोला एका तेलाच्या टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ऑटोमधील दहाही तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. जींद जिल्ह्यातील रामराय गावाजवळ मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान हा अपघात झाला.

ऑटोमध्ये चालकासह ११ तरुण बसलेले होते. त्यातील दहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ऑटोचालकाचा देखील समावेश आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व तरुण मेडिकल आणि शारिरिक चाचणी उत्तीर्ण झाले होते. भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सगळे घरी येत होते. मात्र, लष्करात भरती होणाचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांवर काळाने घाला घातला. मृतांमध्ये दोन सख्या भावांचाही समावेश आहे.

अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री साडेदहाच्या दरम्यान अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ऑटोने सर्वजण जात असताना पाठीमागून येणाऱ्या टँकरने ऑटोला चिरडले. यामध्ये एकजण अजूनही गंभीर जखमी आहे. अपघातानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृतांमधील फक्त तिघांची ओळख पटली असून इतर तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details