भोपाळ- कोरोनामुळे शासनाने पुकारलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे रिक्षांची चाके थांबली आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक रिक्षा कर्जावर घेतल्या आहेत. त्यामुळे त्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशावर संकट आल्याने रिक्षाचालक संसाराचाही विचार न करता त्यात प्रशासनासोबत उभे राहिले आहेत खरे, मात्र त्यांच्या रिक्षांसह संसाराचीही चाके थबकल्याने त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाही.
Coronavirus : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ
हजारो लोक रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर ज्यांना रिक्षा विकत घेता येत नाही, ते दिवसाला 120 ते 150 रुपये दराने रिक्षा भाड्याने घेतात आणि कमाई करून कुटुंब चालवतात. पण, आता लॉकडाऊनमुळे सर्वच थांबले आहे.
भोपाळ आणि राज्यातील मोठ्या शहरांमध्ये स्थानिक वाहतुकीमध्ये ऑटो रिक्षाला खूप महत्व आहे. रिक्षा हे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. हजारो लोक रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर ज्यांना रिक्षा विकत घेता येत नाही, ते दिवसाला 120 ते 150 रुपये दराने रिक्षा भाड्याने घेतात आणि कमाई करून कुटुंब चालवतात. पण, आता लॉकडाऊनमुळे सर्वच थांबले आहे. तर ज्या लोकांनी कर्जावर रिक्षा घेतल्या आहेत, त्यांना लॉकडाऊन जर जास्त वेळ सुरू राहिला, तर रिक्षाचा हप्ता कसा भरायचा याची चिंता लागली आहे.
भोपाळमध्ये संपूर्ण लॉकडाऊनमुळे प्रशासनाने किराणा आणि इतर वस्तूंसाठी होम डिलिव्हरीची व्यवस्था केली आहे. यामध्ये काही रिक्षाचालकांना परवानगी दिली आहे. परंतु, यामध्ये फारच कमी लोकांना काम मिळाले आहे. त्यामुळे अनेकजणांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर प्रशासनाच्या वतीने मदत केली जात असल्याचे दावे खोटे ठरत आहेत.