महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रिक्षाचालक स्वत: बुजवतोय रस्त्यावरील खड्डे; तक्रारी करूनही कारवाई न केल्याने पुढाकार - कर्नाटक रिक्षाचालक

दररोज रिक्षा चालवून दिवसातील किमान २ तास एवढा कालावधी रेड्डी रस्ते बुजवण्यासाठी देतात.

रिक्षाचालक स्वत: बुजवतोय रस्त्यावरील खड्डे; तक्रारी करूनही कारवाई न केल्याने पुढाकार
रिक्षाचालक स्वत: बुजवतोय रस्त्यावरील खड्डे; तक्रारी करूनही कारवाई न केल्याने पुढाकार

By

Published : Oct 28, 2020, 3:13 PM IST

बंगळुरू -आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील केजीएफ तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.

श्रीनिवास रेड्डी हे रिक्षाचालक आहेत. ते दररोज या रस्त्यावरून प्रवास करतात. रस्त्याच्या दुर्दशेला कंटाळून त्यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, रेड्डी यांच्या तक्रारीवरून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे रेड्डी यांनी स्वत: हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. दररोज रिक्षा चालवून दिवसातील किमान २ तास एवढा कालावधी रेड्डी रस्ते बुजवण्यासाठी देतात.

ABOUT THE AUTHOR

...view details