महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी हिंदीमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ - Morrison posted a vide on Diwali

भारतीय सणांमध्ये दिवाळी सर्वात मोठा आनंददायी असा सण आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी हिंदीमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

By

Published : Oct 26, 2019, 5:56 PM IST

नवी दिल्ली -भारतीय सणांमध्ये दिवाळी सर्वात मोठा आनंददायी असा सण आहे. भारताबरोबरच इतर देशांमध्ये देखील दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये खास गोष्ट म्हणजे त्यांनी हिंदी भाषेमध्ये टि्वट कर शुभेच्छा दिल्या आहेत.


स्कॉट मॉरिसन यांनी शुभेच्छा दिल्याचा व्हिडिओ आपल्या टि्वटरवर शेअर केला आहे. नमस्ते! दिवाळीचा सन किती चांगला आहे. मला हा सन खुप अवडतो, असे त्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले आहे.


यापूर्वी त्यांचा मोदीसोबचा सेल्फीदेखील चर्चेमध्ये आला होता. जी २० शिखर परिषदेसाठी हे दोन्ही नेते सध्या जपानमधील ओसाकामध्ये आहेत. त्यावेळीच स्कॉट मॉरिसन यांनी मोदीसोबत सेल्फी घेतला होता, आणि त्याला 'कितने अच्छे है मोदी' असे कॅप्शन दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details