महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण : सहआरोपी राजीव सक्सेनाला ७ दिवसांचा अंतिरम जामीन

एम्सने दाखल केलेले मेडिकल रिपोर्ट सविस्तर नसल्याचे ईडीने म्हटले आहे. सक्सेना यांना ब्लड कॅन्सर असल्याच्या कारणावरून अंतरिम जामीन मिळाला आहे.

By

Published : Feb 14, 2019, 3:57 PM IST

नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी सहआरोपी राजीव सक्सेना यांना ७ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात राजीव सक्सेनांवर ९० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी 'एम्स'ला सक्सेना यांचा 'मेडिकल रिपोर्ट' सादर करण्यास सांगितला आहे. २२ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. एम्सने दाखल केलेले मेडिकल रिपोर्ट सविस्तर नसल्याचे ईडीने म्हटले आहे. सक्सेना यांना ब्लड कॅन्सर असल्याच्या कारणावरून अंतरिम जामीन मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वीच सक्सेनाचे दुबईतून भारतात प्रत्यर्पण करण्यात आलेले होते. सक्सेनासोबत दीपक तलवारलाही भारतात आणल्या गेले होते. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेलचेही यापूर्वीच भारतात प्रत्यर्पण करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details