नवी दिल्ली- निजामुद्दीन तबलिगी प्रकरणानंतर देशात याच विषयाची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, या तबलिगीचे प्रमुख मोहम्मद साद यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करत, पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनुयायांनी क्वारंटाईन करण्याचे आवाहन साद यांनी केले आहे. तसेच मी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्वारंटाईन केले असल्याचे मोहम्मद साद यांनी सांगितले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनुयायांनी क्वारंटाईन व्हा, तबलिगी प्रमुखांचे आवाहन - मोहम्मद साद
निजामुद्दीन तबलिगी प्रकरणानंतर देशात याच विषयाची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, या तबलिगीचे प्रमुख मोहम्मद साद यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करत, पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनुयायांनी क्वारंटाईन करण्याचे आवाहन साद यांनी केले आहे.
Audio of Nizamuddin Markaz chief Mohammad Saad released says had Quarantine myself
राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकझ या धार्मिक कार्यक्रमासाठी तबलिगी समुदायातील अनुयायांनी मोठी गर्दी `ली होती. यानंतर हे अनुयायी देशातील इतर राज्यात प्रवास करत गेले होते. त्यातील काहींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांची संख्या जास्ती असल्यामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात मात.
त्यामुळेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनुयायांनी पुढील १४ दिवस क्वारंटाईन करण्याचे आवाहन निजामुद्दीन येथील तबलिगीचे प्रमुख मोदम्मद साद यांनी केले आहे.