महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कन्हैय्या कुमारवर १५ दिवसांत ८ हल्ले; डी. राजा यांचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना पत्र - जन गन मन

कन्हैय्या कुमारवर गेल्या १५ दिवसांत ८ वेळा हल्ला झाला आहे. बिहारमध्ये 'जन गन मन' यात्रेच्या माध्यमातून कन्हैय्या ठिकठिकाणी दौरा करत आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहे. याच दौऱ्यादरम्यान कन्हैय्यावर वारंवार हल्ला होत आहे.

attacks on Kanhaiya Kumar in Bihar
कन्हैय्या कुमार

By

Published : Feb 16, 2020, 2:24 AM IST

पाटणा - सीपीआयचा तरुण नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर गेल्या १५ दिवसांत ८ वेळा हल्ला झाला आहे. बिहारमध्ये 'जन गण मन' यात्रेच्या माध्यमातून कन्हैय्या ठिकठिकाणी दौरा करत आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहे. याच दौऱ्यादरम्यान कन्हैय्यावर वारंवार हल्ला होत आहे.

जाहीर सभेला संबोधित करताना कन्हैय्या कुमार

भोजपूर जिल्ह्यातील आरा रमना मैदानात आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना कन्हैय्याच्या ताफ्यावर बीबीगंज बाजाराजवळ हल्ला झाला. यात कन्हैय्याच्या गाडीचे नुकसान झाले होते. याठिकाणाहून पोलिसांनी कन्हैय्याला सुरक्षित बाहेर काढले होते.

यात्रेदरम्यान कन्हैय्यावर झालेले हल्ले आणि विरोध -

१) 'जन गण मन' यात्रेदरम्यान सुपौल इथं कन्हैय्याच्या गाडीवर हल्ला झाला होता. यात संपूर्ण गाडीचे नुकसान झाले होते. समाजकंटकांनी गाडीवर दगडफेक केली होती. यात गाडीतील २ जण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे

कन्हैय्याच्या ताफ्यावर दगडफेक

२) दरभंगा येथील राज मैदानावर कन्हैय्याची सभा झाली होती. यानंतर छात्र संघाच्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर गंगाजल टाकून शुद्धिकरण केले होते.

३) बिहारच्या कटिहार इथं सभेसाठी पोहोचताचा कन्हैय्याला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. संपूर्ण रस्त्यावर विरोधासाठी लोक जमले होते. सभा आटोपल्यानंतर कन्हैय्याच्या गाडीवर चप्पल आणि बूट फेकून मारण्यात आले. जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना सभेला परवानगी का दिली, असा विरोधकांचा सवाल होता.

४) जमुई येथे सभेसाठी गेले असताना कन्हैय्याच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी काळी शाई फेकली. यामुळे ताफ्यातील काही गाड्यांवर काळे ऑईल पसरलेले होते. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

ताफ्यातील काही गाड्यांवर काळे ऑईल टाकले.

५) बिहारच्या गया येथे कन्हैय्याच्या दोन सभा नियोजित होत्या. सभास्थळी जाताना कन्हैय्याच्या ताफ्यावर हल्ला झाला. विश्रामपूर गावाजवळ कन्हैय्याच्या गाडीवर दगडफेक आणि काळा रंग फेकण्यात आला.

कैमुरच्या भभुआ येथे कन्हैय्याच्या विरोधात काळे झेंडे घेऊन करणी सेनेचे कार्यकर्ते रस्त्याच्या दुतर्फा उभे होते

६) कैमुरच्या भभुआ इथे कन्हैय्याच्या येण्यापूर्वीच रस्त्यावर करनी सेनेकडून जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले. हातात काळे झेंडे घेऊन करणी सेनेचे कार्यकर्ते रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. कन्हैय्या देशद्रोही आहे, त्यामुळे त्याला विरोध करणार, असे करणी सेनेचे म्हणणे आहे.

जाहीर सभेला संबोधित करताना कन्हैय्या कुमार

७) बिहारच्या नवादा इथे सभेसाठी आलेले असताना काहींनी 'कन्हैय्या गो बॅक'चे नारे लगावले. प्रजातंत्र चौकात कन्हैय्याविरोधातील पोस्टर्स लावण्यात आले होते.

'कन्हैय्या गो बॅक'चे नारे

भाकप महासचिव डी. राजा यांचे नितीश कुमारांना पत्र -

डी. राजा यांनी कन्हैय्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. कन्हैय्यावर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांवरून राजा यांनी चिंता व्यक्त केली आहे. कन्हैय्याला आवश्यक ती सुविधा पुरवण्यात यावी तसेच हल्ल्यात दोषी असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजा यांनी केली आहे.

कन्हैय्या कुमार

पाटणा येथे २९ फेब्रुवारीला यात्रेचा शेवट -

कन्हैय्याची ३० जानेवारीला सुरू झालेली 'जन गण मन' यात्रेचा शेवट २९ फेब्रुवारीला होत आहे. यावेळी पाटणा येथील गांधी मैदानावर मोठ्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण बिहारमध्ये यात्रा करून कन्हैय्याने नागरिकांना २९ फेब्रुवारीला गांधी मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details