महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#coronavirus : इंदूर येथील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी 13 आरोपी अटकेत

गुरुवारी इंदूरच्या टाटपट्टी भागात आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबद्दल स्थानिक लोकांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पुन्हा असा हल्ला करू नका अशी विनवणी देखील केली आहे.

Doctors beat up at Indore
इंदूर येथे डॉक्टरांना मारहाण

By

Published : Apr 3, 2020, 12:17 PM IST

इंदूर -मध्यप्रदेशातील इंदुर शहरातील टाटपट्टी बखल भागात गुरुवारी आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर आयजी विवेक शर्मा यांनी परिसराची पाहणी केली आणि आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलुिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

इंदूर येथील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी 13 आरोपी अटकेत

हेही वाचा...संतापजनक..! तपासणीसाठी गेलेल्या डाॅक्टरांवर इंदौरमध्ये दगडफेक

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. अशा परिस्थितील जीव धोक्यात घालून डाॅक्टर रुग्णांवर उपचार करीत आहेत. मात्र, इंदूर येथील कोर्णाक नगरमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या डाॅक्टरांचा रुग्णांच्या नातेवाईकांनी विरोध केला आहे. उपचारासाठी आलेल्या डाॅक्टरांच्या पथकावर येथील स्थानिक नागरिकांनी दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

रासुकाअंतर्गत ज्या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे त्यांची नावे, मोहम्मद मुस्तफा वडील हाजी मोहम्मद इस्माईल,मोहम्मद गुलरेज (32), शोएब (36) आणि मज्जू (48).हे सर्व टाटपट्टी बखल इंदूर येथील रहिवासी आहेत.

इंदूरचे एसपी सूरज वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा जणांविरूद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर चार जणांवर रासुका अंतर्गत कारवाई केली आहे. लवकरच इतरही काही लोकांना अटक केली जाऊ शकते. यासाठील जवळपासच्या व्हिडिओ फुटेजचा आधार घेतला जात आहे, असे सुरज वर्मा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details