नवी दिल्ली -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. शनिवारी दिल्ली येथील पश्चिम लोकसभा मतदार संघात रोड-शोच्या वेळी एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर संपूर्ण रॅलीत खळबळ उडाली होती. आरोपीला मोतीनगर पोलीस ठाण्यात जेरबंद करण्यात आले आहे.
देश लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. तर, निवडणूका संपण्याच्या तारखाही जवळ येत आहेत. अशात दिल्लीमध्ये विविध पक्षांच्या प्रचाराला उधाण आले आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा मोतीनगर येथील कर्मपुरा येथे रोड-शो होता.
केजरीवाल जिपमध्ये उभे राहून हातवारे करत होते. त्यावेळी लाल टी-शर्टमध्ये एक व्यक्ती अचानक त्यांच्या गाडीवर चढला. काही समजण्यापूर्वीच त्याने केजरीवाल यांना मारले. त्यावेळी केजरीवाल यांचा तोलही गेला होता. मात्र, कर्यकर्त्यांच्या सहायाने ते गाडीतून पडण्यापासून वाचले.