नवी दिल्ली - मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह'ची काही समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. त्यानंतर सर्व स्तरांतून या कृत्याचा निषेध होत आहे. वरिष्ठ भाजप नेते आणि खासदार अमर साबळे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आंबेडकरांच्या घरावर हल्ला म्हणजे राज्यघटनेवर हल्ला, असे ते म्हणाले असून दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह' वर हल्ला म्हणजे राज्यघटनेवर हल्ला - अमर साबळे - अमर साबळे बातमी
महाराष्ट्रात दलितांवर सतत अत्याचाराच्या घटना घडतात. त्यांच्यावर कडक कारवाई न केल्यामुळे विकृत मानसिकतेच्या लोकांना बळ मिळते, असे माजी खासदार अमर साबळे म्हणाले.
‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर दलितांचे ‘आयकॉन’ आहेत. त्याच्या घरावरील हल्ला हा राज्यघटनेवरील आणि दलितांना जी ओळख मिळाली त्यावरील हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यघटना निर्मात्याच्या घरावरील हल्ला म्हणजे हा राज्यघटनेवर, लोकशाहीवर, दलितांच्या ओळखीवरील हल्ला आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे’, असे साबळे म्हणाले.
‘महाराष्ट्रात दलितांवर सतत अत्याचाराच्या घटना घडतात. त्यांच्यावर कडक कारवाई न केल्यामुळे विकृत मानसिकतेच्या लोकांना बळ मिळते. त्यामुळेच बाबासाहेबांचे घर राजगृहवर हल्ला करण्यात आला. महाराष्ट्र सराकारने याची चौकशी समिती स्थापन करायला हवी’, असे साबळे म्हणाले.