महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपी ऋषिकेश देवडीकर पुणे एटीएसच्या ताब्यात - Hrishikesh Devdikar

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील पुणे एटीएसच्या ताब्यात दिले आहे.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण

By

Published : Feb 7, 2020, 5:15 PM IST

Updated : Feb 7, 2020, 6:09 PM IST

मुंबई -ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील पुणे एटीएसच्या ताब्यात दिले आहे. तसेच त्यांना 11 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक 2018 मध्ये नालासोपारा येथे शस्त्रसाठा मिळाल्याप्रकरणाचा तपास करत आहे.

एटीएसने 2018 मध्ये नालासोपारा येथे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी छापे टाकले होते. तेव्हा बॉम्ब, पिस्तूल असा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला होता. त्याप्रकरणी एटीएस तपासणी करत आहे.

दरम्यान, सनबर्न फेस्टिव्हल हे पाश्चात्य संस्कृतीचे द्योतक असल्याचे फेस्टिवलमध्ये गोळीबार करून बॉम्बस्फोट घडवण्याचा देवडीकरचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. गौरी लंकेश हत्या, नालासोपारा शस्त्रसाठा आणि सनबर्न फेस्टिव्हल अशी 'लिंक' जोडली गेली आहे.

आरोपी ऋषिकेश देवडीकरला कर्नाटक पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने झारखंडमधील धनबाद येथून अटक केली होती. आरोपी ऋषिकेश देवडीकर हा मूळचा औरंगाबादचा आहे. हृषिकेश देवडीकर औरंगाबादेत काही वर्षे वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. हृषिकेश औरंगाबादच्या सिडको परिसरात एन 9 भागात पतंजलीचे दुकान चालवत होता.

Last Updated : Feb 7, 2020, 6:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details