महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पेंढा जाळण्याच्या घटनांचे कारण पुढे करत शेतकऱ्यांवर अत्याचार - मायावती - straw burning incidents Uttar Pradesh News

'खासकरून यूपीमध्ये पेंढा जाळण्याच्या कारणावरून शेतकऱ्यांवरील अत्याचार होताहेत, ते अत्यंत निंदनीय आहे. तर, या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यापूर्वी सरकारने त्यांना जाणीवपूर्वक व आवश्यक मदत देण्याची देखील गरज आहे. अशी बसपची मागणी आहे, असे मायावतींनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

बसप अध्यक्ष मायावती न्यूज
बसप अध्यक्ष मायावती न्यूज

By

Published : Nov 8, 2020, 7:14 PM IST

लखनऊ - बहुजन समाज पक्षाने (बसप) राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी पेंढा जाळण्याच्या घटनांमध्ये शेतकर्‍यांशी गैरव्यवहाराबद्दल सरकारवर निशाणा साधला. विशेषतः यूपीच्या प्रदूषणात पेंढा जाळण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांसोबत छळ होत आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा -कमला हॅरिस यांच्या विजयाचा भारतातही जल्लोष; घरांसमोर रांगोळीची सजावट

'खासकरून यूपीमध्ये पेंढा जाळण्याच्या कारणावरून शेतकऱ्यांवरील अत्याचार होताहेत, ते अत्यंत निंदनीय आहे. तर, या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यापूर्वी सरकारने त्यांना जाणीवपूर्वक व आवश्यक मदत देण्याची देखील गरज आहे. अशी बसपची मागणी आहे, असे मायावतींनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात पेंढा जाळण्याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शेतकर्‍यांवर कारवाई होत असल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांना तुरुंगातही पाठवण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये झटापटी झाल्याचेही वृत्त आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधत आहेत. तथापि, मुख्यमंत्री योगी हे शेतकऱ्यांवर होणाऱ्या गैरव्यवहाराबाबत अत्यंत कठोर आहेत. शेतकऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा छळ होऊ नये, असे त्यांनी निर्देश दिले आहेत. तसेच, अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा -'दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट'; आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कबुली

ABOUT THE AUTHOR

...view details