महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ठरलं! " या" तारखेनंतर जगातून कोरोना नष्ट होणार! ज्योतिषाचार्यांनी केला मोठा दावा - ग्वालियर न्यूज

दिवाळीच्या अगोदर कमलनाथ सरकार पडणार, जगात साथीच्या रोग पसरणार अशी भविष्यवाणीही ग्वाल्हेरचे ज्योतिषी पंडित एस.एल. पचौरी यांनी केली होती. 14 डिसेंबर रोजी गुरु ग्रहांचा नाश झाला होता. राहू, केतू आणि शनी ग्रहांवर शुभ ग्रहांचा प्रभाव राहीला नव्हता. त्यामुळे जगात कोरोना पसरला.

astrologer-pandit-sl-pachauri-prediction-on-corona-virus
astrologer-pandit-sl-pachauri-prediction-on-corona-virus

By

Published : Apr 13, 2020, 10:06 AM IST

भोपाल- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जग दहशतीत आहे. जगातील निम्म्याहून अधिक देशात लाॅकडाऊन आहे. अशा परिस्थितीत भारतातील ज्योतिषाचार्य यांनी 20 मे नंतर कोरोना जगातून नष्ट होईल, असा दावा केला आहे. 13 एप्रिलपासून सूर्य आणि मंगळ यांचा एक शक्तिशाली योग आहे. त्यामुळे कोरोना जगातून नष्ट हाईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा-तामिळनाडूत एक हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त; 8 डॉक्टर आणि 5 नर्सही बाधित

दिवाळीच्या अगोदर कमलनाथ सरकार पडणार, जगात साथीच्या रोग पसरणार अशी भविष्यवाणीही ग्वाल्हेरचे ज्योतिषी पंडित एस.एल. पचौरी यांनी केली होती. 14 डिसेंबर रोजी गुरु ग्रहांचा नाश झाला होता. राहू, केतू आणि शनी ग्रहांवर शुभ ग्रहांचा प्रभाव राहीला नव्हता. त्यामुळे जगात कोरोना पसरला. पण आता घाबरुन जाण्याची गरज नाही.

'20 मे नंतर जगातून कोरोना नष्ट होणार'...

13 एप्रिल, म्हणजेच सोमवारी रात्री 8 नंतर, सूर्य आपल्या उच्च मेष राशीत प्रवेश करीत आहे. त्याच सोबत मंगळ देखील त्याच्या उच्च मकर राशीत येत आहे. मंगळाची मेष राशी आहे. मंगळचा मकर राशीमध्ये प्रभाव वाढत आहे. मेष राशीत बसलेला सूर्य ग्रहाला मंगल ग्रह चतुर्थ दृष्टितून पाहत आहे. जो सर्वात शक्तिशाली योग असणार आहे.

ज्योतिषाचार्य म्हणतात की, 13 एप्रिल ते 20 मे दरम्यान वादळासह पाऊस, चक्रीवादळ, अशा घटना घटतील. यामुळे, तयार झालेल्या लाटांमध्ये कोरोनाव्हायरस कायमचा नष्ट होईल. असाप्रकारचा योग 91 वर्षानंतर आला आहे. पंडित एस.एल. पचौरी हे बनारस ज्योतिष संशोधन केंद्राचे प्राचार्य देखील राहिलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details