हैदराबाद- एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती खालावली आहे. ही गोष्ट त्यांच्या घरच्यांना आजच समजली आहे. अकबरुद्दीन यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एमआयएमचे आमदार ओवैसींची प्रकृती बिघडली; लंडनच्या रुग्णालयात भर्ती - अकबरुद्दीन ओवैसी
काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. यासाठी ते लंडनला उपचार घेण्यासाठी गेले आहेत. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली आहे
काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. यासाठी ते लंडनला उपचार घेण्यासाठी गेले आहेत. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. याबाबत अकबरुद्दीन यांचे मोठे भाऊ असुद्दीन यांनी याविषयी सांगताना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. ईद मिलाप या कार्यक्रमाप्रसंगी असुद्दीन ओवैसी यांनी ही माहिती दिली.
अकबरुद्दीन ओवैसी हैदराबाद शहरातील आमदार आहेत. अकबरुद्दीन यांना मागील काही वर्षात चंद्रागुगट्टू येथे उपचार करण्यात येत होते. परंतु, चांगल्या उपचारासाठी ते लंडनला रवाना झाले.