नवी दिल्ली - सद्य घडीला देशभरात भाजपमध्ये मेगाभरती सुरू असून यात आणखी दोघांची भर पडली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ते दोघेही क्रीडापटू आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेशाचा वेग चांगलाच वाढलेला दिसून येत आहे.
या विधानसभा निवडणुकांच्याआधी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग याने भाजमध्ये प्रवेश केला आहे. संदीप सिंग बरोबर ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त हाही भाजपवासी झाला आहे.
हरियाणा राज्यात हॉकीचे प्रचंड वेड आहे. यात संदीप हा भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार राहिला आहे. यामुळे संदीप निवडणुकीसाठी उभा राहिला तर तो जिंकून येण्याची दाट शक्यता आहे, यामुळे भाजपने त्याला प्रवेश दिला आहे.