लखनऊ - संपूर्ण देशामध्ये १८ राज्यांमध्ये ५१ जागांवर आज( सोमवार) पोटनिवडणूका आहेत. तसेच बिहार आणि महाराष्ट्र राज्यामध्ये २ लोकसभा जागांसाठी निवडणूक आहे. उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक ११ विधानसभा जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. पोटनिवडणूक असली तर अनेक ठिकाणी उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत.
कोणकोणत्या राज्यात आहेत विधानसभेच्या पोटनिवडणुका?
- उत्तरप्रदेशमध्ये ११ जागांसाठी मतदान होत आहे.
- गुजरातमध्ये ६ विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका होत आहे.
- बिहार आण केरळमध्ये प्रत्येकी ५ जागांसाठी मतदान होत आहे.
- आसाम पंजाबमध्ये प्रत्येकी ४ जागांसाठी मतदान होत आहे.
- हिमाचल, तमिळनाडू आणि राजस्थानध्ये प्रत्येकी २ जागांसाठी मतदान होत आहे.
- तर अरुणाचप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, पुद्दुच्चेरी, मेघालया, तेलंगानामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होत आहे.
- सिक्कीम राज्यात ३ जागांवर पोटनिवडणूक आहे.
१८ राज्यातील एकून ५१ विधानसभा जागांवर दुपारी १ वाजेपर्यंत १९. ४३ टक्के मतदान झाले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये २४ टक्के, आसाममध्ये ३१.१९ टक्के, बिहारमध्ये १६.९४, गुजरात २० टक्के, हिमाचल प्रदेश सरासरी २४.५, केरळ १५.५८, मध्यप्रदेश २४.७६, मेघालय २२.७२, ओडिशा २५.७०, तर पंजाबमध्ये २३.५८ टक्के मतदान झाले.
विधानसभा पोटनिवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपूर येथे लोकसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.