नवी दिल्ली - काँग्रेसने शनिवारी कर्नाटकातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी ६ उमेदवारांची यादी जारी केली आहे. पक्षाने अथणी येथून गजानन बालचंद्र मंगसूळी, कागवाड येथून भरमगौडा अलागौडा केज आणि गोकाक विधानसभा मतदार संघातून लखन जारकीहोली यांना उमेदवारी दिली आहे. तर, व्यंकटराव घोरपडे यांना विजयनगरातून, रिजवान अरशद यांना शिवाजीनगरातून आणि कृष्णराजपेट जागेवर के. बी. चंद्रशेखर यांना तिकिट दिले आहे.
काँग्रेसने बंगळुरु शिक्षक मतदार संघातून कर्नाटक विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रवीण पीटर यांना संधी दिली आहे. 5 डिसेंबरला कर्नाटकातील 15 विधानसभा जागांसाठी निवडणूक होईल.
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक : काँग्रेसने जारी केली 6 उमेदवारांची यादी नुकतेच, सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस-जेडी(एस) च्या 17 आमदारांना अपात्र ठरवले होते. आता या जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. आनंद सिंह यांनी विजयनगर येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांनी जुलैमध्ये आमदारकीचा राजीनामा दिला.
कर्नाटकातील विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी काँग्रेसच्या तक्रारीवरून या आमदारांना अपात्र घोषित केले होते. सिंह यांनी नुकताच भाजपप्रवेश केला आहे.
भाजपकडून काँग्रेस-जेडी(एस) मधून आलेल्या नेत्यांना तिकिट देण्यात आल्याने पक्षांतर्गत असंतोष निर्माण झाला आहे.