महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममध्ये तलावात पडलेल्या हत्तीच्या पिल्लाची सुटका - rescue

हे हत्तीचे पिल्लू त्याच्या आईसह रेल्वे रूळ ओलांडताना तलावात पडले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आसाम

By

Published : May 11, 2019, 8:04 AM IST

कामरूप - राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य वन्य विभागाने तलावात पडलेल्या हत्तीच्या पिल्लाची सुटका केली आहे. हे हत्तीचे पिल्लू दीपोर बील तलावात शुक्रवारी पडले होते. हा तलाव कामरूप जिल्ह्यात गुवाहाटी शहराच्या नैऋत्येकडे आहे.

हे हत्तीचे पिल्लू त्याच्या आईसह रेल्वे रूळ ओलांडताना तलावात पडले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे पिल्लू मादी जातीचे असून त्याला काही काळासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या पिल्लाची आई सापडली आणि ते तिच्यासोबत निघून गेले तर, योग्य ठरेल, असे वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details