महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाम : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर आक्षेपार्ह भाष्य, आमदाराला अटक - अमीनुल इस्लाम

कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या केंद्र आणि रुग्णालयांबाबत आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी मंगळवारी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) नेते आणि आमदार अमीनुल इस्लामला अटक केली.

By

Published : Apr 7, 2020, 12:54 PM IST

गुवाहाटी - येथील एका विरोधी पक्षाच्या आमदाराला मंगळवारी कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालय आणि सुविधा केंद्रांवर एका ऑडियो क्लिपच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

आसामच्या धिंग मतदारसंघातील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) चे आमदार अमीनुल इस्लाम यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या केंद्रांना, रुग्णालयांना डिटेंशन सेंटरपेक्षाही वाईट असल्याचे भाष्य केले होते. याप्रकरणी त्यांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती राज्य पोलीस प्रमुख ज्योति महंत यांनी एका वृत्त संस्थेला दिली आहे.

माहितीनुसार, दोन व्यक्ती इस्लामवर चर्चेसंबंधीची एक ऑडियो क्लीप ही सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. यामध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा आणि रुग्णालयासंबंधी ते तिरस्काराने बोलत होते.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी रजिस्टरमध्ये नावाची नोंद नसल्याने शंभराहुन अधिक प्रवासी नागरिकांना डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये मुस्लिम नागरिकांची संख्या जास्त असून त्यांची अवस्था अत्याधिक वाईट असल्याचेही यात म्हटले आहे. तसेच, या संभाषणादरम्यान त्यांनी कोरोनाबाधितांवर उपचार करणारे उपचार केंद्र तसेच रुग्णालय हे डिटेंशन सेंटर पेक्षाही वाईट असल्याचे म्हटले आहे.

याप्रकरणी, आम्ही त्यांच्याविरूद्ध गुन्हेगारी कट रचल्याबद्दल आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे राज्य पोलीस प्रमूख महंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details