नवी दिल्ली - देशात कोरोनाचे रुग्णाचे प्रमाण वाढतच चालले आहे. कोरोनामुक्त झालेल्या राज्यांमध्ये सुद्धा धोक्याची घंटा वाजली आहे. मेघालय ,मणिपूर आणि आसाममध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 44 नवे कोरोना रुग्ण आसाममध्ये आढळले असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 188वर पोहचला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी ही माहिती दिली.
गेल्या 24 तासांमध्ये आसाममध्ये आढळले 44 नवे कोरोना रुग्ण - Imphal coronavirus
आसाममध्ये गेल्या 24 तासांत 44 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 188वर पोहचला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी ही माहिती दिली.
![गेल्या 24 तासांमध्ये आसाममध्ये आढळले 44 नवे कोरोना रुग्ण COVID-19](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7284911-755-7284911-1590034750310.jpg)
COVID-19
नव्या आढळलेल्या 44 रुग्णांपैकी 35 रुग्ण गुवाहटीमधील आहेत. तसेच सारुसाजाई क्वारंटाईन सेंटरमधून तीन कोरोना रुग्ण फरार झाले होते. त्यांना परत आणण्यात आले आहे. दरम्यान 48 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 16 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.
मेघालयमध्ये मंगळवारी रात्री 1 कोरोनाबाधित आढळला आहे. त्रिपुरामध्ये मंगळवारी 4 कोरोनाबाधित आढळले असून एकूण कोरोनाबाधित 173 झाले आहेत. त्यातील 38 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.