महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममध्ये पुरात अडकलेल्या 56 जणांना वाचवण्यात एनडीआरएफ टीमला यश - आसाम महापूर

एनडीआरएफ टीमकडून ठिकठिकाणी नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवली जात आहे. तसेच मास्क, अन्नधान्य वाटपही करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल 1 हजार 450 नागरिकांना पुरातून वाचवण्यात जवानांना यश आले आहे.

assam flood
आसाममध्ये पुरात अडकलेल्या 56 जणांना वाचवण्यात एनडीआरएफ टीमला यश

By

Published : Jul 21, 2020, 2:22 PM IST

गोलपारा (आसाम) -राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने सोमवारी आसाम राज्यातील माटिया, गोलपारा येथील 56 लोकांना वाचवले आहे. गेले तीन दिवस या भागामध्ये सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे येथील मानवी वस्तीमध्ये सुद्धा पाणी घुसू लागले आहे. एनडीआरएफचे जवान जिवाची बाजी लावून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलवत आहेत.

एनडीआरएफ टीमकडून ठिकठिकाणी नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवली जात आहे. तसेच मास्क, अन्नधान्य वाटपही करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल 1 हजार 450 नागरिकांना पुरातून वाचवण्यात जवानांना यश आले आहे. आसाममधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफचे 12 पथके तैनात करण्यात आले आहेत.राज्यात पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. आतापर्यंत पुरात 85 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 24 जिल्ह्यातील 2 हजार 325 गावांत पुरामुळे नुकसान झाले आहे. तर एकूण 24 लाख, 48 हजार, 128 जणांना याचा फटका बसला आहे.

आसाममध्ये पुराचा हाहाकार सुरू आहे. ब्रह्मपुत्रासह राज्यातील इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांना या पूराचा फटका बसला आहे. राज्यातील बराक नदीतील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. आसाम मध्ये सध्या सर्वत्र पुराच्या पाण्याचा वेढा दिसून येत आहे. आसाममधील नागरिकांना दरवर्षी अतिवृष्टीमुळे महापुराचा सामना करावा लागतो.

ABOUT THE AUTHOR

...view details