महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममध्ये महापूराचा कहर; आतापर्यंत ८७ जणांचा बळी, लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली

ब्रम्हपुत्रा आणि तिच्या उपनद्या सध्या धोक्याच्या पातळीबाहेर वाहत आहेत. पूरबाधित परिसरात बचावकार्य सुरूच आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आसाममध्ये महापुराचा कहर;
आसाममध्ये महापुराचा कहर;

By

Published : Jul 22, 2020, 11:27 AM IST

गुवाहटी- आसाम राज्यात सध्या महापुराचा कहर सुरू आहे. तब्बल २४ जिल्ह्यांना ब्रम्हपुत्रा नदीला आलेल्या महापुराचा फटका बसला आहे. यामध्ये तब्बल ६९ तालुके आणि २ हजार ३२३ गावे पूरग्रस्त झाली आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पोहोचवली जात आहे. एनडीआरफच्या पथकाकडून बचाव कार्य निरंतरपणे सुरूच आहे. या महापुराने आतापर्यत ८७ नागरिकांचा बळी घेतला आहे. तर कांझिरंगा अभयारण्यातील कित्येक प्राण्यांना जलसमाधी मिळाली आहे.

ब्रम्हपुत्रेला आलेल्या महापुरामुळे आसामची परिस्थिती दयनीय झाली आहे. येथील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले असून आतापर्यंत या पुराने तब्बल २४ लाख १९ हजार १८५ नागरिकांना पुराचा तडाखा बसला आहे. तर आसाम राज्यातील एकूण १ कोटी १० लाख ३२ हजार ३५४ हेक्टर जमीन या पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे शेती पिके उद्ध्वस्त झाली आहेत. ब्रम्हपुत्रा आणि तिच्या उपनद्याला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी सरकारच्या वतीने सुरक्षित स्थळी ३७९ निवाराशेड उभारण्यात आली आहेत.

ब्रम्हपुत्रा आणि तिच्या उपनद्या सध्या धोक्याच्या पातळीबाहेर वाहत आहेत. पूरबाधित परिसरात बचावकार्य सुरूच आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details