गुवाहटी (आसाम) - बुधवारी आसाम राज्यामध्ये महापुरात आणखी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जवळपास 26 जिल्ह्यातील 36 लोकांना पुराचा फटका बसला आहे. ही माहिती आसामच्या आपत्ती व्यावस्थापन विभागाने दिली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमधील 3 नागरिक हे मोरिगाव जिल्ह्यातील आहेत. तसेच बारपेटा जिल्ह्यात 2 तर सोनिटपूरसह गोलघाट जिल्ह्यातील प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत आसामध्ये 92 नागिरकांना महापुरामध्ये जीव गमवावा लागला आहे. यातील प्रत्यक्ष पुरात वाहून गेलेल्याची संख्या ही 66 आहे तर 26 लोकांचा भिंत किंवा जमिनीखाली दबून मृत्यू झाला आहे. दरवर्षी धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या ब्रम्हपुत्रेने यंदाही आसाममध्ये हाहाकार माजवला आहे.