दिब्रुगड(आसाम)-आसाममध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने पुराच्या पाण्याची पातळी वाढली आहे. संततधार पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे दिब्रुगड जिल्ह्यातील २५ हजार लोकांना फटका बसला आहेे, असे दिब्रुगडचे उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यातील १६ जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांच्या संकटात वाढ झालीय. यामुळे राज्यातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
दिब्रुगड जिल्ह्यामध्ये १४ निवारा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पुराचे पाणी सेवानिवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या घरात घुसले आहे. प्रशासनाने त्यांच्या आजारी आईला सुरक्षित स्थळी हलवले आहे.