महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 18, 2020, 9:37 AM IST

ETV Bharat / bharat

आसाममध्ये पुराचा कहर ; 76 जणांचा मृत्यू तर 36 लाख लोकांना फटका

आसाममध्ये कोरोना संकटात पुराचं संकट आलं आहे. शुक्रवारी पुरामुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा 76 वर पोहचला आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यातील 36 लाख लोकांना या महापुराचा फटका बसला आहे.

आसाममध्ये महापूर
आसाममध्ये महापूर

गुवाहटी - आसाममध्ये कोरोना संकटात पुराचं संकट आलं आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांना या पूराचा फटका बसला आहे. शुक्रवारी पुरामुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा 76 वर पोहचला आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यातील 36 लाख लोकांना या महापुराचा फटका बसला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) दैनंदिन पूर-बुलेटिननुसा 4 जिल्ह्यातील 22 लाख लोकांना महापूराचा फटका बसला आहे. यात धुबरी(892,109), गोलपारा (443,768), बरपेटा (429,708) आणि मोरीगाव (424,541) या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ठिकठिकाणी पाणी भरले असल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आपला जीव वाचवण्यासाठी प्राणी सुरक्षित जागा शोधत आहेत. उद्यानातील 86 टक्के प्राण्याचा पूरामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 125 प्राण्याची सुटका करण्यात आली आहे. तर 2 हजार 200 पेक्षा जास्त एक एक शिंगी गेंडे अथवा भारतीय गेंडे पुरात बुडले आहेत, असे वन विभाग आणि एएसडीएमएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने 28 जिल्ह्यांत 711 मदत शिबिरे व वितरण केंद्रे सुरू केली आहेत, जिथे जवळपास 51 हजार पुरुष, महिला व मुलांनी आश्रय घेतला आहे. दरम्यान आसामच्या वेगवेगळ्या भागात संततधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details