गुवाहटी -अवैधरित्या भारतात घुसखोरी केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिकाला तीन वर्षांचा तुरुंगवास झाला आहे. सिल्चर जिल्ह्यातील न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सात वर्षांपूर्वी तो अवैधरित्या भारतात आला होता.
अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकाला तुरुंगवास - बांग्लादेशी घुसखोर
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. न्यूपाने यांनी निकाल दिला. एनामुद्दीन हा मूळचा बांगलादेशमधील हबीगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे.
संग्रहित छायाचित्र
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. न्यूपाने यांनी निकाल दिला. एनामुद्दीन हा मूळचा बांगलादेशमधील हबीगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास झाला असून ५०० रुपये दंडही करण्यात आला आहे. ५ एप्रिल २०१३ साली तो भारतात आला होता. आसाममधील चचर जिल्ह्यात त्याने किनखाल सीमा परिसरातून घुसखोरी केली होती.