महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममध्ये बस-ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक; भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू - आसाम अपघात

आसाममध्ये आज सकाळी बस आणि ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता. यामधील मृतांचा आकडा आता १० वर पोहोचला आहे.

Assam bus-traveller accident

By

Published : Sep 23, 2019, 4:59 PM IST

गुवाहाटी - आसामच्या शिवसागरमध्ये आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात १० जण मृत्यूमुखी पडले आहेत. भरधाव वेगात असणाऱ्या बस आणि ट्रॅव्हलरची या अपघातात समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अपघात झालेली बस गोलाघाटवरून दिलबर्गाला चालली होती, तर ट्रॅव्हलर ही दिलबर्गावरून शिवसागरकडे चालली होती. यात शिवसागरजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. त्यामुळे ट्रॅव्हलर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली.अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details