हैदराबाद - एका पाच वर्षीय आशियाई नर सिंहाचा आज (शनिवारी) मृत्यू झाला. अर्धांगवायू सोबतच शरिरातील विविध अवयव निकामी झाल्याने या सिंहाचा मृत्यू झाला. जीतू नावाच्या या सिंहावर हैदराबाद येथील नेहरू प्राणीसंग्रहालयात मागील १२ दिवसांपासून उपचार सुरू होते. ८ जुलै पासून जीतू आपल्या पायांची हालचाल करू शकत नव्हता. तेव्हा पासूनच त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अतिदक्षतेखाली ठेवले होते.
अर्धांगवायूमुळे आशियाई सिंहाचा हैदराबाद येथे मृत्यू - hyderabad
जीतू नावाच्या या सिंहावर हैदराबाद येथील नेहरू प्राणीसंग्रहालयात मागील १२ दिवसांपासून उपचार सुरू होते.या पाच वर्षीय आशियाई नर सिंहाचा आज मृत्यू झाला.
जीतू सिंहाला वाचविण्यासाठी तज्ञ पशुवैद्यांची मदत घेतली गेली होती. परंतु, जीतूला वाचवण्यात आम्हाला यश आले नाही, अशी माहिती संग्रहालय प्रशासनाने दिली. शवविच्छेदन केले असता, जीतूचा मृत्यू अर्धांगवायू सोबतच शरीरातील विविध अवयव निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनाचे नमुने पशुवैद्यकीय महाविद्यालय, राजेंद्रनगर आणि पशु-जैविक महाविद्यालय, शांतीनगर येथे पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहे. २८ मे, २०१४ रोजी अतुल व ज्योती या आशियाई सिंहाच्या जोडीने जीतू सिंहाला जन्म दिला होता.