महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कोविंद यांना राष्ट्रपती करणे' हे भाजपचे गुजरात निवडणुकीसाठी मतांचे राजकारण - गेहलोत

'गुजरात निवडणुकीत फायदा करुन घेण्यासाठी भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवले. कारण, गुजरातच्या निवडणुका येऊन ठेपल्या होत्या. आपले सरकार गुजरातमध्ये येणार नाही, या विचाराने ते घाबरले होते. जातीय समीकरण बसवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवण्यात आले.

राष्ट्रपतींविषयी अशोक गेहलोत यांचे वादग्रस्त वक्तव्य

By

Published : Apr 17, 2019, 6:28 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरु असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमध्ये आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भर टाकली आहे. गेहलोत यांनी या विधानामुळे निष्कारण वाद ओढवून घेतला आहे. भाजपला गुजरात निवडणुसाठी विशिष्ट जातीच्या लोकांना खूश करायचे होते, यासाठीच त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांचे नाव निश्चित केले, असे त्यांनी म्हटले आहे.


'गुजरात निवडणुकीत फायदा करुन घेण्यासाठी भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवले. कारण, गुजरातच्या निवडणुका येऊन ठेपल्या होत्या. आपले सरकार गुजरातमध्ये येणार नाही, या विचाराने ते घाबरले होते. जातीय समीकरण बसवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवण्यात आले. मात्र, त्यामुळे लालकृष्ण अडवाणी या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले.


यापूर्वी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मुस्लिमांना सपा-बसपा युतीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सोमवारी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा प्रमुख मायावती आणि भाजप नेत्या मेनका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर कारवाई करीत त्यांना दोन दिवसांसाठी प्रचाराला बंदी घातली. आता जातीवरून वक्तव्य केल्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनाही अशाच कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

दरम्यान, गेहलोत यांनी माध्यमांनी त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले, असा आरोप केला आहे. हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, देशाच्या राष्ट्रपतींविषयी आपल्याला नितांत आदर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती कोविंद यांना भेटल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि विनम्रतेने आपण प्रभावित झालो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details