महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'गुन्हेगारांच्या वकिलांनी मला न्यायालयातच दिले खुले आव्हान.. फाशी होणारच नाही'

देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यावर निर्भयाची आई आशादेवी यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

निर्भयाच्या आई
निर्भयाच्या आई

By

Published : Jan 31, 2020, 7:53 PM IST

Updated : Feb 1, 2020, 7:51 AM IST

नवी दिल्ली - देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यावर निर्भयाच्या आई आशादेवी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 'गुन्हेगारांच्या वकिलांनी आम्हाला न्यायालयातच खुले आव्हान दिले आहे की, या गुन्हेगारांची फाशी अनंत काळापर्यंत लांबणीवर पडेल. सरकार आणि न्यायालय आरोपींसमोर आम्हाला झुकवत आहे. मात्र, मात्र अपराध्यांना फाशी द्यावीच लागेल,' असा आक्रोश निर्भयाच्या आईने केला.


दोषींच्या वकिलांनी मला न्यायालयातच खुले आव्हान दिले आहे की, कायद्यातील त्रुटीमुळे दोषींची फाशी अनंत काळासाठी लांबणीवर पडेल. 2012 पासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. सरकार आणि न्यायालय आरोपींसमोर आम्हाला झुकवत आहे. गुन्हेगारांचे वकील आम्हाला थेट अशा प्रकारचे आव्हान देत आहेत, ही सर्वांत जास्त दु:खाची बाब आहे. मला त्यांची फाशी लांबणीवर पडल्यापेक्षाही गुन्हेगारांच्या वकिलांनी अशा प्रकारचे आव्हान दिल्यामुळे अत्यंत वेदना होत आहेत. हे काय सुरू आहे ते न्यायालयाने, दिल्ली सरकारने आणि केंद्र सरकराने पाहावे. माझा कायद्यावर संपूर्ण विश्वास असून मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. सरकारला दोषींना फाशी द्यावीच लागेल, असे निर्भयाच्या आईने म्हटले आहे.

निर्भया प्रकरणातील आरोपींना 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्याचा निकाल दिला होता. त्यावर आज पुन्हा निर्णय देत पटियाला न्यायालयाने आरोपींच्या फाशीला स्थगिती दिली. गुरुवारी आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी न्यायालयाकडे 1 फेब्रुवारी या फाशीच्या तारखेला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

यापूर्वी आरोपींना 22 जानेवरीला फाशी देण्यात येणार होती. त्यानंतर न्यायालयाने तारीख पुढे ढकलून 1 फेब्रुवारीला निर्भयाच्या 4 दोषींना फाशी देण्याचे निश्चित केले होते. मात्र, आज पुन्हा पटियाला न्यायालयाने फाशी आगामी आदेशापर्यंत पुढे ढकलली आहे.

Last Updated : Feb 1, 2020, 7:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details