नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी विधेयकाची प्रत फाडली. यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेच्या हंगामी अध्यक्षा रमा देवी यांनी ओवेसींना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.
जिन्नांची विचारसरणी नाकारुन मौलाना आझादांच्या तत्त्वांचा पुरस्कार करुन वाटचाल केली. आपले आणि हिंदुस्तानचे 1 हजार वर्षांपासूनचे संबंध असल्याचे आझाद म्हणाले होते. मग आताच्या सरकारला मुस्लिमांची इतकी अडचण का होते? असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला.