नवी दिल्ली- महाराष्ट्र आणि केरळमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घेतला असून देशभरातून मदत केली जात आहे. एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही पुरग्रस्तांसाठी हात पुढे केला असून त्यांनी या दोन्ही राज्यांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. ही मदत मुख्यमंत्री मदत निधीत जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्त महाराष्ट्र, केरळसाठी असदुद्दीन ओवैसींची प्रत्येकी 10 लाखांची मदत - ओवैसींची पुरग्रस्तांना 10 लाखांची मदत
एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्र आणि केरळमधील पुरग्रस्तांसाठी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. ही मदत मुख्यमंत्री मदत निधीत जमा केली जाणार आहे.
असदुद्दीन ओवैसी
वेळेवर मदत मिळू न शकल्याने पूरग्रस्तांना मोठ्या संकटांना सामना करावा लागला. मात्र, या कठीण प्रसंगी आम्ही पूरग्रस्तांसोबत खंबीरपणे उभे आहोत, असे ओवैसी म्हणाले आहेत. पूरग्रस्तांसाठी अल्लाकडे प्रार्थना करा, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हपूर जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक लोक बेघर झाले असून 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्येही पुरामुळे मोठे नुकसान झाले असून 91 जणांचा मृत्यू झाला आहे तर 59 लोक बेपत्ता आहेत.