हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. यातच कोरोनाविषाणू प्रादुर्भावाबद्दल काही अफवा देशभर पसरवण्यात येत आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'व्हॉट्सअॅप फॉरवर्डच्या माध्यमातून अफवा पसरवून कोरोना विषाणूला हरवता येणार नाही. तसेच मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे हे देखील कोरोनाविषाणूवरील औषध नाही, हे भाजपच्या प्रचारकांना कळायला हवे', असे टि्वट ओवैसी यांनी केले आहे.
'मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे हे कोरोनावरील औषध नाही' - asaduddin Owaisi Targets Bjp By Tweeting
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
'अनियोजीत लॉकडाऊन आणि कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यात आलेल्या अपयशावरील टीका टाळण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, भाजपच्या प्रचारकांना हे माहित असले पाहिजे की, व्हॉट्सअॅप फॉरवर्डच्या माध्यमातून कोरोना विषाणूला हरवता येणार नाही. तसेच मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे हे देखील कोरोना विषाणूवरील औषध नाही, किंवा चाचणीचा पुरेसा पर्यायही असू शकत नाही', असे टि्वट ओवौसी यांनी केले आहे.
कोरोना जगभरामध्ये पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अनेक प्रकारची खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरत आहे. त्यातून नागरिकांध्ये आणखी भीतीचे वातावरण पसरत असून संभ्रम निर्माण झाला आहे. व्हॉट्सअॅपवरुन होणारा 'फेक न्यूज'च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप एक नवीन अपडेच लॉंच करत आहे. यामुळे आता एखादा संदेश एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला, किंवा एकाच ग्रुपमध्ये फॉरवर्ड करता येणार आहे.