नवी दिल्ली -नागरिक्तव दुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर बांगलादेशाचे गृहमंत्री असदुझ्झामन खान यांनी भारत दौरा रद्द केला. त्यावरून एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'मैत्री कशी गमवावी आणि आपला प्रभाव कसा कमी करावा', यावर अमित शाहजी तुम्ही एक पुस्तक लिहू शकता, असा टोला त्यांनी शाह यांना लगावला आहे.
'अमित शाहजी तुम्ही मित्र कसे गमवावे यावर पुस्तक लिहू शकता', ओवेसी यांची टीका - National Register of Citizens
एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
'अमित शाहजी ही कसली चाणक्य निती आहे. शेजारी देश आपल्याला जीडीपी ,जीवनस्तर आणि राहणीमानाविषयी सांगत आहे. जेव्हा तुम्ही देशाला कुमकुवत करण्याच्या विचारामध्ये आहात, असे ओवेसी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. तर दुसऱ्या टि्वटमध्ये 'मैत्री कशी गमवावी आणि आपला प्रभाव कसा कमी करावा', यावर तुम्ही एक पुस्तक लिहू शकता,असे ओवेसी यांनी म्हटले. त्यांनी हे टि्वट शाह यांना टॅगदेखील केले आहे.
ओवेसी यांनी शनिवारी नागरिक्तव विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एमआयएम पक्ष हा नेहमीच भारताची धर्मनिरपेक्षता आणि घटनात्मक लोकशाही टिकविण्यासाठी संघर्ष करेल. ही लढाई प्रत्येक व्यासपीठावरून आणि प्रत्येक घटनात्मक शस्त्रे वापरून लढली जाईल, असे ओवेसी यांनी म्हटले.
गेल्या सोमवारी ओवेसी यांनी लोकसभा भवनामध्ये नागरिक्तव दुरुस्ती विधेयकावरून आक्रमक होत विधेयकाची प्रत फाडली होती. हे विधेयक आमच्या स्वातंत्र्य सैनानींचा अपमान करणारे आहे. देशाचे पुन्हा एकदा विभाजन करण्यासाठी हे विधेयक आणले गेले आहे. सरकारनं आणलेले विधेयक घटनेच्या गाभ्याविरोधात आहे. देशाची फाळणी करणारे हे विधेयक मी फाडून टाकतो, असे ओवेसी म्हणाले.
दरम्यान नागरिक्तव दुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर बांगलादेशाचे गृहमंत्री असदुझ्झामन खान यांनी पुर्वनियोजीत भारत दौरा रद्द केला. त्यानंतर त्यांच्याकडून अतर्गंत कार्यामुळे दौरा रद्द केल्याचे सांगण्यात आले. मात्र नागरिक्तव विधेयकाचे पडसाद पडल्यामुळे दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे.