हैदराबाद- राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष जागांची बेरीज-वजाबाकी करण्यात व्यग्र आहे. यात एमआयएम व वंचित एकत्र लढणार का यावर सध्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी यावर भाष्य करत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच अंतिम निर्णय असल्याचे सांगितले आहे.
एमआयएम-वंचित युती फिसकटली हेही वाचा - काँग्रेसला धक्का.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागा देण्याचे सांगितले होते. हा आकडा कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. त्यातच आता ओवेसी यांनीसुद्धा आघाडी तुटली असल्याचा खुलासा केला.
हेही वाचा - दलित मतांसाठी आम्हाला नेत्यांची गरज नाही - इम्तियाज जलील
इम्तियाज जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून त्यांचाच निर्णय अंतिम राहील, असे सांगत ओवेसी यांनी वंचितसोबतच्या आघाडीतून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले आहे.