पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-एत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी किशनजंगमध्ये एका प्रचार सभेला संबोधीत केले. यावेळी त्यांन काँग्रेस, आरजेडी आणि एनडीएवर जोरदार टीका केली. तसेच एनपीआर आणि सीएएवर कोरोना महामारीनंतर मोर्चा काढण्याचे आवाहन केले. 'मी चिथावणीखोर भाषण दिले, असे काँग्रेस आणि राजेडी म्हणेल. मात्र, जोपर्यंत मी जिवंत आहे. तोपर्यंत मी फक्त खरं सांगत राहणार, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
भाजप फक्त खोटी आश्वानसे देऊन सत्तेत आली आहे. बिहार विधानसभा 2015 च्या निवडणुकांमध्ये महागठबंधनच्या नावावर आरजेडी, काँग्रेस आणि जेडीयूने अल्पसंख्याक लोकांना धोका दिला. काँग्रेस आणि आरजेडीमुळे नितिश कुमार सत्तेत आहेत. महागठबंधन सरकार सत्तेत आल्यानंतर बिहारला भाजप आणि आरएसएसमुक्त करू, असे खोटे आश्वासन दिले होते, असे ओवेसी म्हणाले. प्रदेशाचा विकास करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-एत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाच्या उमेदवाराल मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.