शाहीन बाग हिंसा : 'भाजपच म्हणणं गोळीबार करणाऱ्या तरुणाने अधोरेखीत केलं' - असदुद्दीन ओवेसींचे टि्वट
शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
असदुद्दीन ओवेसी
नवी दिल्ली - शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 'जी लोक हिंदूच्या हिताची गोष्ट करतील तेच देशामध्ये राज करतील, हेच भाजपचे दशकापासून म्हणणे आहे. तेच त्या तरुणाने अधोरेखीत केले', असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
शनिवारी शाहीन बागमध्ये एका कपील नावाच्या व्यक्तीने हवेमध्ये गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर देशामध्ये फक्त हिंदूंचेच चालणार, असे तो म्हणाला होता. तसेच गुरुवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान गोळीबार झाला होता. सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या राजघाटपासून विद्यापीठापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू होता. यावेळी एका तरुणाने गोळीबार केला. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला होता.