नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कानशिलात मारणाऱ्या माथेफिरु आरोपीला दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली आहे. २०११ साली अरविंद सिंग उर्फ हरविंदर सिंग या व्यक्तीने शरद पवारांच्या कानशिलामध्ये मारली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. दिल्ली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर आरोपीला अटक केली.
शरद पवारांच्या कानशिलात मारणारा माथेफिरु 8 वर्षांनंतर अटकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कानशिलात मारणाऱ्या माथेफिरु आरोपीला दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली आहे. २०११ साली अरविंदसिंग उर्फ हरविंदरसिंग या व्यक्तीने शरद पवारांच्या कानशिलात मारली होती.
२०१४ साली दिल्ली न्यायालयाने हरविंदरसिंगला फरारी घोषित ठरवले होते. २०११ साली शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना हरविंदसिंगने दिल्लीत शरद पवारांवर हल्ला केला होता. त्यानंतर तो फरार होता. दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनी आरोपीला अटक केली. घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र, कारवाई सुरू असतानाच तो फरार झाला होता. न्यायालयात हजर न राहिल्याने आरोपी हरविंदसिंगला फरार घोषित करण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. मात्र, ११ नोव्हेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.
आरोपी हरिविंदर सिंग दिल्लीतील स्वतंत्र नगर येथील जे ब्लॉक येथील रहिवासी आहे. शरद पवारांवर हल्ला करण्याव्यतिरिक्त एका पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलल्या प्रकरणी हरविंदरसिंग याच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.