नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारत विजयी झेंडा रोवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाच्या शपथ विधी सोहळ्याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, अरविंद केजरीवाल हे दिल्लीकरांसोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून इतर राज्यातील कोणत्याच नेत्यांना आमत्रंण दिले जाणार नाही.
अरविंद केजरीवाल दिल्लीकरांसोबत घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, नेत्यांना आमत्रंण नाही
अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथ विधी सोहळ्याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, अरविंद केजरीवाल हे दिल्लीकरांसोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
अरविंद केजरीवाल हे 16 फेब्रुवारीला रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमामध्ये इतर राज्यातील कोणत्याच मुख्यमंत्र्याना आणि नेत्यांना बोलावण्यात येणार नाही. केजरीवाल दिल्लीतील सामान्य जनतेसोबत शपथ घेणार आहेत, अशी माहिती आपचे संयोजक गोपाल राय यांनी दिली आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आपने ६२ जागा जिंकल्या, तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने सर्व शक्ती पणाला लावूनही दिल्ली काबीज करता आली नाही. स्थानिक विकासांच्या मुद्द्यांवर भर देत केजरीवाल यांनी निवडणुकीत बाजी मारली.