नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारत विजयी झेंडा रोवला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला दिल्लीकरांनी पुन्हा एकदा राजधानीच्या तख्तावर बसवले आहे. विजयानंतर आता अरविंद केजरीवाल हे 16 फेब्रुवरीला रामलीला मैदानावर शपथ घेणार आहेत. सलग तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान आज केजरीवाल यांच्या निवासस्थानी नवयुक्त आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत केजरीवाल यांची विधी मंडळ पक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे.
सत्तेचे तिसरे पर्व : 'या' दिवशी घेणार केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची शपथ - Delhi Assembly Election 2020
अरविंद केजरीवाल हे 16 फेब्रुवरीला रामलीला मैदानावर शपथ घेणार आहेत. सलग तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आपने ६२ जागा जिंकल्या तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले. विजयानंतर केजरीवाल यांनी जनतेला संबोधीत केले. हा विजय माझा नसून दिल्लीकरांचा आहे. तसेच, या निवडणुकांनी नव्या विचारांच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
केजरीवाल हे 14 फेब्रुवरीला शपथ घेतील असा अनेकांचा अदांज होता. कारण, त्यांचं आणि व्हॅलेंटाईन डेचं खास कनेक्शन असल्याचं मानलं जात. दिल्लीतील 2013 विधासभा निवडणुकीमध्ये आपला सत्ता मिळाली होती. मात्र हे सरकार फक्त 49 दिवस टिकलं आणि केजरीवाला यांनी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच राजीनामा दिला होता. त्यानंतर 2015 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्णबहूमत मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारीलाच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तसेच 2018 मध्ये महिन्यात सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपने एका व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि व्हॅलेंटाईन डे यांच एक अनोखं कनेक्शन असल्याचे बोलेले जाते.